राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सतावतेय 'ही' भीती

    दिनांक : 14-Jun-2020
Total Views |
वॉशिंग्टन,
अमेरिकेत येत्या राष्ट्राध्यक्ष निव़डणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. याच पृष्ठभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीची भीती सतावत आहे. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेला धमकीच दिली आहे. जर मी निवडणूक हरलो तर अमेरिकेसाठी वाईट असेल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच हरल्यानंतर काय करणार हे देखील त्यांनी सांगितले आहे.

donal dump_1  H 
 
 
ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये असलेली नाराजी, कोरोनामुळे होणारे हजारो मृत्यू आणि नुकतीच श्वेतवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या अमानुष हत्येमुळे सुरु असलेले हिंसक आंदोलन येती राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक सोपी नसल्याचे दिसत आहे. यामुळे ट्रम्प यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. जर डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रपती निवडणूक हरले तर ते स्वेच्छेने ऑफिस खाली करणार नाहीत, असे बोलले जात होते. मात्र, यावर ट्रम्प यांनी सांगितले की, मी हरल्यानंतर चूपचाप ऑफिसमधून निघून जाईन. शुक्रवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर खुलासा केला. यामध्ये त्यांनी जर मी निवडणूक हरलो तर मला वाटते की ही हार देशासाठी खूप वाईट गोष्ट असेल, असे म्हटले.