रोटरी क्लब ऑफ नंदुरबारतर्फे कोरोना योध्यांना पीपीई कीट वाटप

    दिनांक : 14-Jun-2020
Total Views |
 

Nandurbar_PPE_Kit_1  
 
नंदुरबार : कोरोना महामारी रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांबरोबरच पोलीस अधिकारी-कर्मचारी सुद्धा जीवाची बाजी लावत असून नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कसा होईल यासाठी कार्यरत आहेत. या कोरोना योध्यांना रोटरी क्लब ऑफ नंदुरबारतर्फे पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
 
 
रोटरी क्लब नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. याचाच एक भाग म्हणून कोरोनाशी लढताना कोना योद्धांना सुरक्षाकवच देण्याचे कार्य रोटरी क्लब ऑफ नंदुरबारतर्फे करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ नंदुरबारचे अध्यक्ष डॉ.निर्मल गुजराती व रोटरी सदस्यांनी जिल्हा कारागृह वर्ग-१ चे तुरुंग अधिकारी प्रदीप रणदिवे व विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश मलिये यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी तुरुंग अधिकारी माळी, रोटरी क्लब ऑफ नंदुरबारचे इलेक्ट प्रेसिडेंट पंकज पाठक, सेक्रेटरी नीरज देशपांडे, रोटरी सदस्य दीपक शहा, हितेश सुगंधी आदी सदस्य व तुरुंग कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
 
 
कोरोनाशी हिंमतीने लढणार्‍या पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचा या अनुषंगाने गौरव करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सींगचे काटेकोर पालन करण्यात आले. याप्रसंगी तुरुंगाधिकारी प्रदीप रणदिवे यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तसेच सामाजिक बांधिलकी जपणारा क्लब असून कोरोना वॉरियर्सला मदत केल्याबद्दल गौरवोद्गार काढले. रोटरी क्लबचे आभार मानून भविष्यात असेच सहकार्य करावे, असे सांगून क्लबच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.