संकटाच्या काळात भगवद्गीतेमध्ये मिळते शांती

    दिनांक : 14-Jun-2020
Total Views |
 
अमेरिकन-भारतीय खा. तुलसी गबार्ड यांचे प्रतिपादन
 
 
Virtual Program of Hawaii
 
 
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस महामारी संकटा पाठोपाठ अमेरिकेला वर्णभेदी विरोधी आंदोलनामुळे मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभुमीवर अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड यांनी लोकांना भगवत गीतेमधून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यास सांगितले आहे. तुलसी गबार्ड म्हणाल्या की या गोंधळाच्या काळात तुम्हाला भगवत गीतेमधून निश्चितता, सामर्थ्य आणि शांती मिळेल. हवाईच्या कॉंग्रेसवूमन गबार्ड एका व्हर्च्युअल कार्यक्रमात म्हणाल्या की, या कठीण काळात उद्या काय होईल हे नीट कोणालाही सांगता येणार नाही. मात्र आपण कृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्ती योग आणि कर्मयोगाद्वारे निश्चितता, शक्ती आणि शांती मिळवू शकतो.
 
 
क्लास ऑफ २०२० हिंदू विद्यार्थ्यांशी बोलताना जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. हिंदू स्टूडेंट्स काउंसिलने या व्हर्च्युअल हिंदू कमेंसमेंटचे आयोजन केले होते. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया येथील विद्यार्थ्यांनी देखील या कार्यक्रमात भाग घेतला होता.
 
 
त्या म्हणाल्या, आयुष्यातील या नव्या टप्प्याबद्दल विचार करत असताना स्वतःला आयुष्याचे ध्येय काय आहे हे विचारा. हा एक गुढ प्रश्न आहे. जर तुम्हाला कळाले की तुमच्या आयुष्याचे ध्येय देवाची आणि त्याच्या मुलांची सेवा करणे, कर्म योगाचा सराव हे आहे, तर तुम्ही नक्कीच खर्‍या यशस्वी आयुष्याकडे वाटचाल करत आहात. तात्पुरत्या गोष्टींद्वारे यश ठरवता येत नाही. मात्र यशस्वी आणि आनंदी आयुष्य हे तुमच्या सेवेच्या केंद्री असते.
 
 
हा कार्यक्रमा भगवत गीतेच्या उपदेशासंबंधी केंद्रीत होता. दरम्यान, हिंदू स्टुडेंट्स काउंसिलची स्थापना १९९० साली झाली होती. ही नॉर्थ अमेरिकेमधील सर्वात मोठी हिंदू युवक संघटना आहे.