अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

    दिनांक : 14-Jun-2020
Total Views |

Shushant Sinh Rajput_1&nb
मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर नावलौकीक मिळविणारा अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत (३४) याने आत्महत्या केली आहे. वांद्ˆयातील घरी गळफास घेऊन त्याने जीवनयात्रा संपविली. सुशांत हा नैराश्यात होता. आपल्या घरातील एका खोलीत त्यानं पंख्याला गळफास घेत जीवन संपवले. काही दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजर असलेल्या दिशा सलियाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून तो तणावाखाली असल्याची माहिती मिळाली आहे.
सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी झाला. सुरुवातीला मालिकांमधून करिअरची सुरूवात करणार्‍या सुशांतने २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘काय पोछे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. त्याच्यानंतर सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.
एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरीमध्ये महेंद्रसिंह धोनीची भूमिका साकारत सुशांतने देशासह परदेशातही नावलौकिक मिळविला. सोबतच शुद्ध देसी रोमान्स, पी.के., डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी अशा सिनेमांमध्ये त्याने लक्षवेधी भूमिका निभावल्या होत्या. अभिनय क्षेत्रात ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेद्वारे सुरुवात केली होती. तर ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेद्वारे तो घराघरात पोहोचत रसिकांचे मन जिंकले होते.
 
सुशांतचा परिचय
सुशांतचा जन्म बिहारच्या पाटणामध्ये झाला. सुशांतचे वडील सरकारी अधिकारी असून त्यांचे कुटुंब २००० च्या सुरुवातीला दिल्लीला स्थायिक झाले होते. त्याचे सुरुवातीचं शिक्षण पाटणा येथील सेंट कॅरेंस हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर दिल्लीच्या कुलाची हंसराज मॉडल स्कूलमध्ये सुशांतचे शिक्षण झाले. मॅकेनिकल इंजीनिअरिंगचे शिक्षण दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमधून पूर्ण केले.