जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्याअधिष्ठातापदी डॉ. जयप्रकाश रामानंद रुजू

    दिनांक : 13-Jun-2020
Total Views |

dr jayprakash_1 &nbs
 
जळगाव, १३ जून
जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला पूर्णवेळ कारभार सांभाळण्यासाठी नवीन अधिष्ठाता म्हणून धुळे येथील अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद शनिवारी रुजू झाले. त्यांच्या नियुक्तीचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी काढले. डॉ. रामानंद यांनी जळगावचे अधिष्ठाता म्हणून पदभार स्वीकारला असून सध्या रुग्णालयाच्या धुरा सांभाळण्याचे मोठे आवाहन त्यांच्यासमोर आहे.
 
येथील कोविड जिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित महिला बेपत्ता होते. त्यानंतर गेल्या १० जून रोजी तिचा् मृतदेह येथीच शौचालयात सापडला. याबाबत सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी राज्य सरकारने कारवाईची बडगा उगरला आहे. याप्रकरणात जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह तीन डॉक्टरांचे निलबंन केले आहे. त्यानंतर डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती झाली.
 
 
८२ वर्षीय कोरोनाबाधित वृद्धेच्या अशा धक्कादायक मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले असून, राज्य सरकारने ते गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येत आहे. सुरुवातीला अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह तिघांचे निलंबन झाले. त्यानंतर पुन्हा ५ जणांवर कारवाई झाली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख यांच्यासह ३ सफाई कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ८ जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.
 
 
पोलीस तपासासाठी ’एसआयटी’ गठीत
कोरोनाबाधित वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात वॉर्ड क्रमांक ७ मधील डॉक्टर्स, परिचारिका तसेच वॉर्डबॉय आणि वॉर्डलेडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा सखोल तपासासाठी पोलीस प्रशासनाने ८ अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश असलेली एक ’एसआयटी’ (विशेष तपास समिती) नेमली आहे. या समितीत तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अकबर पटेल, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, सायबर सेल विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अंगद नेमाने, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार राजेंद्र पाटील, हेड कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील आणि पोलीस नाईक महेश महाजन यांचा समावेश आहे.
 
नवीन २५ परिचारिका कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीे
रुग्णालयाची विस्कटलेली घडी बसवण्यावर भर-कोरोनाबाधित ८२ वर्षीय वृद्धेचा शौचालयात मृतदेह आढळल्यानंतर येथील भोंगळ कारभार समोर आला होता. त्यानंतर रुग्णालयाची विस्कटलेली घडी बसण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. त्या अनुषंगाने जळगावसाठी १६ डॉक्टर्स, त्याचप्रमाणे २० नर्सिंग स्टाफची नव्याने नियुक्ती देखील करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकार्‍यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २५ स्टाफ नर्सची तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीचे आदेश दिले आहे. येथील रुग्णांना चांगली सेवा देता यावी, कोरोनाचा मृत्यूदर रोखता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे.