पहूरला तीन कोरोनाबाधित

    दिनांक : 13-Jun-2020
Total Views |
 
संपर्कातील ३२ जणांना केले क्वारंटाईन
 

Corona _1  H x  
 
 
पहूर, ता.जामनेर : पहूर पेठ येथील २ जणांचे तपासणी अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने पहूर येथील कोरोनाबाधीतांची संख्या ३ वर पोहोचली आहे. पहूर पेठ मधील एक तर पहूर पेठ गृप ग्रामपंचायतचे वार्ड असलेले खर्चाणे येथील एक असे २ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांच्या संपर्कातील ३२ जणांना पहूर कोविड सेंटर असलेल्या महावीर पब्लिक शाळेत व आर.टी.लेले विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ. हर्षल चॉंदा यांनी दिली.
 
ंयेथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असून एकुण रुग्ण ३ झाले आहे. पहूरकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.पहूर पेठ येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात असलेल्या १० जणांना महावीर पब्लिक स्कूलमध्ये तर खर्चाणे येथील २२ जणांना आर.टी.लेले विद्यालयात क्वाराटांईन करण्यात आले आहे.