गाव छोटं मात्र, काम मोठं : ब्राह्मणे येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना

    दिनांक : 13-Jun-2020
Total Views |
 
 
र्मल स्क्रिनिंग, मास्क, डेटॉल साबण, होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप, गाव नियमित सॅनिटाईज
 

Brahmanshevge Corona_1&nb 
कळमसरे ता.अमळनेर : कोरोनाने सध्या जगभर थैमान घातलेलं असतांना कोरोनाचा पार्श्वभूमीवर सध्या उपाय योजना केल्या जात आहेत. ग्रामपंचायत बाह्मणे येथे सुध्दा मार्च महिन्यापासून ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सावधगिरीसाठी उपाययोजना सुरू आहेत. एप्रिल महिन्यात नागरीकांना घरोघरी मास्क वाटप, हॅन्डवॉश करण्यासाठी डेटॉल साबणचे वाटप करण्यात आले होते.
 
 
सध्या ग्रामपंचायततर्फे नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग, पल्स ऑक्सोमीटर द्वारे घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. दररोज माहिती अपडेट केली जात आहे, त्याचबरोबर संपूर्ण गावात नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आयुष मंत्रालयाने सुचविलेले आर्सेनिक अल्बम ३० या होमीओपॅथी गोळ्याचे वाटप सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. संपुर्ण गावाची आजपर्यंत सहा वेळा फवारणी करून गाव सँनेटराईझ करण्यात आले आहे.
 
 
बाह्मणे गाव जळगाव-धुळे जिल्हा सीमेवर शेवटचे गाव असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील अनेक नागरिक चोरवाटाद्वारे गावातून जळगाव जिल्ह्यात येण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतू ग्रामपंचायत प्रशासनाने लॉकडाऊन काळात संपुर्ण ग्रामस्थांच्या मदतीने कडक पाउलं उचलत गावाच्या संपुर्ण सीमा बंद केल्या. प्रशासनाचे संपुर्ण नियमांचे काटेकोरपणे पालन केले. बाहेरगावाहून येणार्‍या नागरिकांना आठवडाभर जि.प.शाळेत किंवा घरात क्वारंटाईन करण्यात येत आहे. बाहेरून येणार्‍या लोकांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जात आहे.
 
 
वरील सर्व कामासाठी लोकनियुक्त सरपंच प्रविण ओंकार पाटील, उपसरपंच प्रकाश राजाराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणेश धर्मराज भामरे, युवराज गंभीर पाटील, रविताबाई भैय्यासाहेब पाटील, संगीताबाई शरद पाटील, मंगलाबाई रमेश पाटील, सरलाबाई मंगा भिल, ग्रामसेवक अभिजित देवरे, अंगणवाडी सेविका प्रमिलाबाई हिरालाल पाटील, आशावर्कर शारदा पाटील, ग्रामपंचायत शिपाई अधिकार पाटील व संपुर्ण ग्रामस्थ मंडळ परिश्रम घेत आहे.
 
 
ग्रामपंचायतीस केलेल्या सहकार्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाने अमळनेरच्या प्रांत अधिकारी सीमा अहिरे, तहसिलदार मिलिंद वाघ, पंचायत समिती बि.डी.ओ. संदीप वायाळ व मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.सागर पाटील व आरोग्य साहाय्यक मोहन धनगर आदी सर्व अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त केले.