शेदुर्णीत उद्यापासून पाच दिवस जनता कर्फ्यू

    दिनांक : 12-Jun-2020
Total Views |
 
 
 अतुल जहागिरदार
 
 शेदुर्णी, ता.जामनेर : येथे सर्वपक्षिय पदाधिकारी, व्यापारी असो.पदाधिकारी, पत्रकार यांची कोेरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी बैठक झाली. त्यात १३ ते १७ जून या काळात शेदुर्णीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात अत्यांवश्यक डॉक्टर, मेडिकल, दुध डेअरी, कृषी केंद्र या सेवा सुरू ठेऊन अन्य सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
 
 
 तसेच पाच दिवस जनता कर्फ्यू संपल्यानंतर १८ जूनपासून शेदुर्णीतील दुकाने रोज सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दुपारी तीन वाजेनंतर अत्यांवश्यक सेवा वगळता दुकाने सुरू रांहणार नाहीत. तसेच १८ ते ३० जून दरम्यान शेदुर्णीत बाजाराच्या दिवशी बुधवारी अत्यांवश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. शेदुर्णीकरांकडून पाळण्यात येणार्‍या जनता कर्फ्यूचे निवेदन सर्व पक्षीय पदाधिकारी, व्यापारी असोसिएशन, पत्रकार यांच्या वतीने शेदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, पहूर पो.स्टे.चे स.पो.नि.राकेशसिंग परदेशी यांना देण्यात आले आहे.
 
 
या बैठकीला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, भाजपा जेष्ठ नेते अमृत खलसे, पंडिराव जोहरे, मनसेचे डॉ.विजयानंद कुलकर्णी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रविंद्र गुजर, शिवसेना शहर प्रमुख भैय्या गुजर, व्यापारी असो.चे पदाधिकारी तजय अग्रवाल, राजेश कोटेचा, संदीप ललवाणी, धिरज जैन, मनोज झंवर, गिरीश कुलकर्णी, नगरसेवक निलेश थोरात, सतिष बारी, आलीम तडवी, गणेश जोहरे, शाम गुजर, श्रीकृष्ण चौधरी, शरद बारी, शंकर बारी, पप्पू गायकवाड, राहूल धनगर, विजय धुमाळ, योगेश गुजर, शाकीर पिंजारी, फारूख खाटीक, गणेश धनगर, पत्रकार, नागरीक, पीएसआय किरण बर्गे आदी उपस्थित होते. यावेळी भाजपा जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, तजय अग्रवाल, डॉ.विजयानंद कुलकर्णी, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, स.पो.नि.राकेशसिंग परदेशी यांनी मनोगत व्यक्त करीत नागरीकांना जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.