नंदुरबार येथील घरफोडीप्रकरणातील आरोपी जेरबंद

    दिनांक : 12-Jun-2020
Total Views |
 
NBR DARODA_1  H
 
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारीच्या सर्व उपाययोजना राज्य शासन युध्द् पातळीवर प्रयत्न करीत आहेत. तसेच मार्च महिण्याच्या तिसर्‍या आठवड्यात देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव जास्त सुरु झाल्याने 15 मार्च पासुन सर्व शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतल्याने लॉकडाऊनचा फायदा काही चोरट्यांनी घेतला. नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नगाव तिसी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तेल, दाळ, तांदुळ, तसेच शाळेतील संगणक संच व प्रोजेटर असा एकुण 18,900रु.किंमतीचा मुद्देमाल अज्ञात आरोपींनी शाळेचे बंद दरवाजाचे कुलुप तोडून चोरी केला. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे प्रमिलाबाई साहेबराव देसाई नंदुरबार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
 
 
वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. कारागृहातून सोडण्यात आलेल्या आरोपीतांवर संशय येत होता. त्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील व आजू-बाजूच्या शहरात राहत असलेले व पॅरोल रजेवर सोडण्यात आलेल्या आरोपीतांवर पाळत ठेवण्यात आली. सुमारे 6 ते 7 दिवसापूर्वी नगावं तिसी येथे जि.प. शाळेमध्ये झालेली चोरी भालेर येथील रविंद्र कथ्थु, कृष्णा चव्हाण, विठ्ठल कोळी यांनी केलेली असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तात्काळ आपल्या पथकास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशीत केले. नंदुरबार तालुयातील भालेर येथे जाऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयीत इसमाचा शोध घेतला असता तिसी गावातुन रविद्र कथ्थू यास ताब्यात घेऊन प्राथमिक विचारपुस केली. पथकातील कर्मचार्‍यांनी त्यास पोलीसी खाया दाखवुन त्यास बोलते करुन त्याने त्याचे नांव रविंद्र उर्फ सोनु कथ्थु पवार वय-23 रा. भालेर ता.जि. नंदुरबार असे सांगुन सदरचा गुन्हा त्याने त्याचे तिसी येथील आणखी तीन साथीदार यांचे मदतीने केला असल्याची कबुली दिली. इतर तिन आरोपी फरार होण्याआधी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तिसी येथुनकृष्णा रतिलाल चव्हाण (कोळी) वय 25, विठ्ठल रतिलाल कोळी (चव्हाण) वय-23 सर्व रा.तिसी ता.जि. नंदुरबार यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडून 12 हजार रु.किं.चे डेल कंपणीचे प्रोजेक्टर, 2हजार रु.किं.चे डेल कंपणीचे सी.पी.यू. असा एकुण 14 हजार 216 मुद्देमाल जप्त करुन त्यांना ताब्यात घेतले.
 
 
ही कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पो. नि.किशोर नवले, पोलीस हवालदार रविंद्र पाडवी, सजन वाघ, पोलीस नाईक विशाल नागरे, बापू बागुल, जितेंद्र अहिरराव, पो.शि. यशोदिप ओगले यांच्या पथकाने केली.