महारक्तदान शिबिरात ३७० बाटल्यांचे संकलन

    दिनांक : 11-Jun-2020
Total Views |
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त उपक्रम

ncp_1  H x W: 0 
 
जळगाव : सध्याच्या वातावरणात रक्ताचा साठा शासकीय रुग्णालयात व रक्तपेढ्यांमध्ये अल्प असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस, गुलाबराव देवकर फाऊंडेशन व मजूर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त महारक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.
 
 
दिवसभरात नागरिकांनी रक्तगट तपासणी करून घेतले तसेच रक्तदान केले. याप्रसंगी वर्धापनदिनानिमित्त जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ध्वजारोहण करण्यात आले. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते रक्तदान कक्षाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
 
 
त्याप्रसंगी जिल्हाकार्याध्यक्ष विलास पाटील, हाजी गप्फार मलिक, नामदेव चौधरी, मंगला पाटील, ममता सोनवणे विश्वस्त विशाल देवकर, अभिषेक पाटील, फाऊंडेशनचे अध्यक्ष लिलाधर तायडे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
 
 
रक्तदान शिबीराला जळगाव शहरातील व जळगाव ग्रामीण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी व सहकार्यांनी प्रचंड उत्साहाने सहभाग नोंदवला. दिवसभरात ३७० बाटल्यांचे संकलन झाले व ७४८ लोकांनी मोफत रक्तगट तपासणी केली. या महाशिबीराच्या निमित्ताने गुलाबराव देवकर फाऊंडेशनतर्फे ५ हजार रक्तदात्यांची यादी तयार करण्याचा संकल्प आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
 
 
कार्यक्रमाला डॉ. सुषमा चौधरी, रमेश माणिक पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, रविंद्र भिला पाटील, राजेश पाटील, मधुकर पाटील, नवल पाटील, बंटी चव्हाण, अनील खडसे, नाना पाटील, उपस्थित होते. तर या शिबीरासाच्या यशस्वीतेसाठी देवकर फाऊंडेशनचे विश्वस्त विशाल देवकर, अध्यक्ष लिलाधर तायडे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम चौधरी, अजय सोनवणे, खुशाल चव्हाण, रोहिदास पाटील, बबलू पाटील, सुजीत शिंदे, सुनील पाटील, आरोग्यदूत संजू अहिरे, चित्रनिश पाटील, प्रफुल्ल देवकर, प्रसाद तायडे, तन्मय चौधरी, कुणाल पाटील, भूषण पाटील, संजय चव्हाण, मुसा पटेल, नाटू पवार आदींनी परिश्रम घेतले.
राष्ट्रवादी सेवादलाचे वाय.जी.महाजन यांनी सूत्रसंचालन केले.