नंदुरबारला स्नेहभोजनास ५० पेक्षा जास्त व्यक्तिंना आमंत्रण, गुन्हा दाखल

    दिनांक : 11-Jun-2020
Total Views |
 
 
 
 
नंदुरबारला स्नेहभोजनास ५० पेक्षा जास्त व्यक्तिंना आमंत्रण, गुन्हा दाखल
 
 
नंदुरबार : जिल्ह्यातील संचारबंदी आदेश आणि साथ रोग प्रतिबंधक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल नंदुरबार येथील परवेजभाई करामतभाई खान यांच्याविरुद्ध तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
 
 
परवेज खान यांनी ३० जूनपर्यंत मनाई आदेश लागू असताना या आदेशाचा भंग करून मौजे झराळी येथील फार्म हाऊसवर मुलाच्या लग्न समारंभानिमित्त स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास ५० व्यक्तीची परवानगी असताना त्यापेक्षा अधिक व्यक्तिंना आमंत्रित करण्यात आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याने आणि संसर्गजन्य आजार पसरून मानवी जिवीतास धोका उत्पन्न होण्याची ही कृती असल्याने प्रकरणो गांभिर्य लक्षात घेऊन तहसीलदार थोरात यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५४ आणि साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम ३ नुसार हा गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
स्नेहभोजन प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भारुड यांनी उपविभागीय अधिकार्‍यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक नंदुबार यांची संयुक्त समिती नेमण्यात आली होती.