अखेर सिव्हिलमधील महिलेच्या मृत्यूप्रकरणी अधिष्ठाता निलंबित

    दिनांक : 11-Jun-2020
Total Views |
  जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे याचे आदेश 
civil_1  H x W: 
 
जळगाव, ११ जून
सिव्हील हॉस्पीटलमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणी अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह पाच जणांना निलंबीत करण्यात आले असून याचे आदेश आज देण्यात आले आहेत.
 
 
सिव्हील हॉस्पीटलमधील शौचालयात कोरोना बाधीत वृध्द महिलेच्या मृत्यूने खळबळ उडाली असून या प्रकरणी जनभावना तीव्र झालेली आहे. या संदर्भात कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत कालच मिळाले होते. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैंरे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुयोग चौधरी, डॉ. कल्पना घनकवार यांच्यासह पाच जणांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. गुरुवारी निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये तीन अधिकारी आणि दोन संबंधीत वॉर्डच्या परिचारिकांचा समावेश आहे.