जळगाव जनता सहकारी बँकेच्या खान्देशातील पहिल्या ‘एटीएम ऑन व्हील’चा शुभारंभ

    दिनांक : 11-Jun-2020
Total Views |
कोरोना ः एटीएमसाठी बाहेर पडू नये यासाठी जिल्हाभरात उपक्रम
 
JJSB_1  H x W:  
जळगाव, ११ जून
सध्याच्या कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने खांदेशातील पहिल्या ‘एटीएम ऑन व्हील’ या एक नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला आहे.
 
 
जळगाव जनता सहकारी बँक ही सामाजिक बांधिलकी जोपासून समाजातील सर्व घटकांना उपयोग होईल या उद्देशाने आपल्या सेवा देत आहे. याचाच एक भाग म्हणून आज रोजी या अभिनव उपक्रमेचा शुभारंभ जळगाव शहरातील महाबळ चौकातून करण्यात आला. सद्य स्थितीत लोकांनी घराबाहेर पडू नये या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली असून एटीएम ऑन व्हील यात कोणत्याही बँकेच्या सर्व एटीएम कार्ड धारकांना आपले कार्ड वापरुन रक्कम काढता येणार आहे. जळगाव शहराच्या विविध भागासह हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवला जाणार आहे.
 
 
या उपक्रमाचा प्रारंभ स्पेक्ट्रम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे दीपक चौधरी यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बँकेचे संचालक सतीश मदाने, परिसराचे नगरसेवक नितिन बर्डे, सामाजिक कार्यकर्ते नीलेश कुलकर्णी, उद्योजक गणेश मोरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते.