इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फ़े दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

    दिनांक : 10-Jun-2020
Total Views |

Jalgaon Redcross_1 &
 
जळगाव : सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थीतीत इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंन्द्राच्या वतीने दिव्यांग व्यक्तींकडे विशेष लक्ष पुरवले जात आहे. त्या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक किराणा वस्तूचे वाटप करणे, दिव्यांग मुलांच्या पालकांचे समुपदेशन करणे, त्यांच्या गरजेनुसार पूर्तता करणे तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याच्यादृष्टिने अर्सेनीक अलबम-३० या होमीयोपॅथी औषधीचे वाटप करण्यात येत आहे.
 
 
संचारबंदीच्या काळात दिव्यांग व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाह करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्यामुळे रोजचा उदर निर्वाहाचा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयापुढे उभा राहीला. ही समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार शहरातील दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबीयांना मोफत किराणा किटचे वाटप करण्यात येत आहे.
 
 
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने १५० कुटुंबियांना किराणा किटचे व १० हजार कुटुंबियांना अर्सेनीक अलबम-३० या होमीयोपॅथी औषधीचे मोफत वाटप करण्यात आले आहे. तसेच शहरातील दिव्यांग व्यक्तींच्या मागणीनुसार त्यांना आवश्यक सेवा पुरवण्यास रेडक्रॉस कटीबंध असून तशी मागणी रेडक्रॉस भवन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केद्रात करणे आवश्यक आहे.
 
 
या सेवा उपक्रमास इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, अनिल कांकरीया, आपत्ती व्यवस्थापनचे सुभाष सांखला नोडल ऑफीसर जी. टी. महाजन, सह सचिव राजेश यावलकर, प्रकल्प प्रमुख डॉ. अपर्णा मकासरे यांचे मोलाचे योगदान लाभत
आहे.