जामनेर : वीज मीटर फेरफारप्रकरणी ९८ हजारांचा दंड; पोलिसात गुन्हा

    दिनांक : 10-Jun-2020
Total Views |
 

Electricity meter_1  
 
जामनेर : शहरातील दत्तचैतन्य नगरमधील रहीवाशी पुरणसींग अर्जुनसींग शेखावत यांना विज मिटरमधील फेर-फार केल्याप्रकरणी वीज वितरण विभागातर्फे तब्बल ९८ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात येऊन त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
 
 
गेल्या १७ मार्च २०२० रोजी विज वितरण विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला होता. त्यावेळी मिटरमधे फेरफार केल्याचे दिसून आले. मीटर बंद करून विजेचा अनधीकृतपणे ८,५८६ वीज युनीटचा वापर केला. परीणामी जळगाव येथील भरारी पथकाचे कार्यकारी अभियंता हेमंत ठोसरे यांच्या फिर्यादीवरून भारतीय विद्युत कायदा सन २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार योगेश महाजन करीत आहेत.