चोपडा तालुक्यात कोरोनाबाधितांची शतकाकडे वाटचाल

    दिनांक : 10-Jun-2020
Total Views |
 
जनता कर्फ्यू सुरूच
 

corona_1  H x W 
 
चोपडा : कोरोना व्हायरसबाधीत रुग्णांची संख्या शतकाकडे वाटचाल करीत असताना मंगळवारी चोपडा शहरात २० कोरोना बाधित रुग्ण असल्याचे चाचणी अंतर्गत समोर आल्याने नागरिकांमध्ये भीती आहे. मंगळवारी प्राप्त ५३ अहवालात ३३ निगेटिव्ह आले आहेत. तर २० पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ९४ झाली आहे.
 
त्यापैकी आज पटवे अळी आठ,सहयोग कॉलनी चार, शिंदे वाडा तीन, मेन रोड वरील किराणा दुकानात काम करणारे तीन,भाई कोतवाल रोडवर एक, पाटील गढी खाई वाडा भागातील एक रुग्ण कोरोना बाधीत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर यांनी दिली आहे. आज कोरोनाच्या रुग्णांची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या जनता कर्फ्यूच्या दुस-या दिवशी शहरात अभूतपुर्व शांतता होती. शहरात जनता कर्फ्यू असताना विविध बँकांच्या ए.टी.एम.वर मात्र बँकेच्या ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. या गर्दीत सोशल डिस्टसिंग देखील पाळले जात नसल्याचे चित्र आहे. तालुक्यात नियमित पगारदारांसोबतच कृषी कर्ज विविध सोसायट्यांनी दिल्यानंतर त्याची रक्कम रुपे कार्डनेच निघत असल्यामुळे शेतकर्‍याना रांगामध्ये उभे राहून पैसे काढावे लागते.