कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार, अधिष्ठातांसह सात जण निलंबीत

    दिनांक : 10-Jun-2020
Total Views |
खासदार उन्मेश पाटील यांच्या तक्रारीवरून डॉ. लहानेंची कारवाई
 
MP Patil_1  H x
 
 
जळगाव, १० जून
जळगाव जिल्हा रूग्णालयात बेपत्ता झालेल्या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह बाथरूमध्ये आढळून आल्याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक आणि ५ प्राध्यापकांना आरोग्य विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी तात्काळ निलंबीत केल्याची माहिती खा. उन्मेश पाटील यांनी ‘तरुण भारत’ला दिली. यासंदर्भात खा. पाटील यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडेही तक्रार केली होती. दरम्यान, अधिष्ठातापदी कोल्हापूरचे डॉ. सदानंद यांची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.
 
दरम्यान, आता खुप झाले... इगो बाजूला ठेवा... राजकारण बंद करा... तात्काळ १५ वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करा, अशा स्पष्ट सूचनाही खा. पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना केल्या.