धुळ्याला ७ रुग्ण कोरोनामुक्त

    दिनांक : 10-Jun-2020
Total Views |

Dhule Discharge_1 &n 
 
 
धुळे : धुळे जिल्हा रुग्णालयासह छगनमल बाफना आयुर्वेद महाविद्यालय, नगावबारी, धुळे येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील दोन, असे सात रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
 
जिल्हा रुग्णालयातून तीन परिचारिकांसह पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, कोरोनाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. अभय शिनकर, डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते. तसेच नगावबारी, धुळे येथे कार्यान्वित कोविड केअर सेंटरमधील दोन रुग्णांना कोरोना विषाणूमुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला.
 
 
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश जाधव, डॉ. निखिल पाटील, डॉ. गायत्री पगारे, डॉ. स्मिता हातोळकर, रवींद्र सोनार, तनुजा सन्यासे, कविता गोडवान, सारिका बोडाळे, संदीप जाधव, प्रमोद वाघ, अभिषेक गायकवाड आदी उपस्थित होते.
 
 
कोविड केअर सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, कोरोनाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, तालुका नोडल अधिकारी सत्यनारायण मुरमुरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तरन्नूम पटेल यांचे मार्गदर्शन लाभत आहे.