संसर्ग वाढला; जिल्ह्यात आढळले ९६ नवीन रुग्ण

    दिनांक : 25-Nov-2020
Total Views |
दिवसभरात ४१ जण कोरोनामुक्त, एकाचा मृत्यू
 
dfnk_1  H x W:
 
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्यास सुरुवात होत असून बुधवारी तब्बल ९६ नवीन रुग्ण आढळून आले. ४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून दिवसभरात एका जणाचा मृत्यू झाला.
 
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५४ हजार ३३० इतकी आहे. त्यापैकी ५२ हजार ५२५ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ हजार २९१ रूग्णांचा मृत्यू झाला. तर सध्या जिल्ह्यात विविध रुग्णालयात ५१४ उपचार सुरु आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६८ टक्क्यांपर्यत पोहोचले आहे. तर मृत्यूदर २.३८ इतका आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.सी.चव्हाण यांनी दिली.
 
आजची आकडेवारी अशी
नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर २३, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ २९, अमळनेर १, चोपडा ७, पाचोरा ३, भडगाव १, धरणगाव ०, यावल ४, एरंडोल ०, जामनेर ९, रावेर ३, पारोळा २, चाळीसगाव २, मुक्ताईनगर १, बोदवड ० आणि इतर जिल्ह्यातील ७ अशा एकूण ९६ जणांचा समावेश आहे.