जिल्ह्यात ६५३ जण कोरोनामुक्त

    दिनांक : 04-Oct-2020
Total Views |
३३१ नव्या रुग्णांची भर, ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

dfnk_1  H x W:  
 
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढीचे प्रमाण कमी झाले असून बरे होणारी रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी दिवसभरात ३३१ नवे रुग्ण आढळून आले असून ६५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा ८८.६० टक्क्यांवर आला आहे. मात्र रविवारी रुग्णांच्या संख्येत काही अंशी वाढ झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
 
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याचे सर्वांच्या चिंतेत भर पडली होती. परंंतु गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांचा आकडा काही प्रमाणात मंदावला असून बाधितांपेक्षा पेक्षा बरे होणार्‍यांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे ३३१ नवे रूग्ण आढळून आले तर ६५३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच आतापर्यंत बाधितांची संख्या ही ४९ हजार ४३५ इतकी तर त्यापैकी ४३ हजार ८०१ जण बरे झाली असून १ हजार २०४ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४ हजार ४३० जणांवर सध्या उपचार सुरु आहे.
 
असे आढळले रुग्ण
शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात ३३१ नवे रुग्ण आढळले. यामध्ये जळगाव शहर ६८, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ २४, अमळनेर ५, चोपडा १२, पाचोरा १३, भडगाव ६, धरणगाव २, यावल ०, एरंडोल १, जामनेर १०१, रावेर ८, पारोळा ३, चाळीसगाव ७३, मुक्ताईनगर ९, बोदवड २ तर इतर जिल्ह्यातील जणांचा समावेश आहे.
 
६ जणांचा मृत्यू
रविवारी दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये भुसावळ शहरातील दोन, जळगाव शहर, जामनेर, रावेर व बोदवड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
 
जामनेरने गाठली शंभरी
जिल्ह्यातील बाधितांचा आकडा कमी होत आहे. मात्र रविवारी जामनेर तालुक्यात बाधितांनी शंभरी गाठली असून याठिकाणी १०१ नवे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीती
आहे.