समूह शेतीतून शेतकर्‍यांनी देशाचे हित साधावे : खा.रक्षाताई खडसे

    दिनांक : 02-Oct-2020
Total Views |
 
फैजपूर ता. यावल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वखाली केंद्र सरकारने सुधारणा केलेले कृषी विधेयक हे शेतकर्‍यांचे हितावह असतांना विरोधक याबाबी निरर्थक दिशाभूल करीत आहे. याबाबी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जागोजागी शेतकर्‍यांशी संवाद साधून विधेयकाचे शेतकरी हित समजून दिले पाहिजे. शेतीमित्र बचतगट - शेती माल उत्पादन समूहातून तरुण शेतकर्‍यांनी आपल्यासह - देशाचे कृषी हित साधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन खा. रक्षाताई खडसे यांनी केले. फैजपूर येथे सेवा सप्ताहनिमित्त आयोजित सांगता कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
 
 
 
Faizpur_Rakshatai_1 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक, भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रखर राष्ट्रभक्ती चे उपासक स्व .पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्ताने सेवा सप्ताह विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. महात्मा गांधी यांची , माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी फैजपूर नगरीत सोहळा झाला. या सोहळ्याला जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सकाळी खंडोबा मंदिर परिसरात सामूहिक साफसफाई-स्वच्छता करण्यात आली.
 
 
सभागृहात पं.दीनदयाळ उपाध्याय,राष्ट्रपिता माहात्मा गांधी ,माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ,स्व हरिभाऊ जावळे यांच्या तैलचित्राला खा. रक्षाताई खडसे व जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी न अभिवादन केले. याप्रसंगी केंद्रीय कृषी विधेयकातील नवीन तरतुदीचे स्वागतार्ह उपस्थित शेतकरी यांनी खा.रक्षाताई खडसे व जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांचा सत्कार केला. यावेळी ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्षपदी हर्षल पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी श्याम भंगाळे, महिला मोर्चा शहराध्यक्षपदी जयश्री चौधरी, आदिवासी सेल शहराध्यक्षपदी रशीद तडवी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा स्वागत सत्कार जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे व खा.रक्षाताई खडसे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. तसेच माजी जिल्हाध्यक्ष स्व.रिभाऊ जावळे यांच्या प्रथम जयंतीच्या पूर्वसंध्याचे औचित्य साधून माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांचच्या विद्यमाने जावळे यांच्या १०० तैलचित्राचे भाजपा शाखाध्यक्षांना वितरित करण्यात आले. कृषी विधेयकामुळे कृषी मालातील व्यापारी, दलाल पॉलिसीला आळा बसेल व अन्यधान्यच्या खर्‍या मालकाला न्याय व दिलासा मिळणार असल्याचे अध्यक्षीय मनोगतात जिल्हाध्यक्ष आ. भोळे यांनी सांगितले. यावेळी भोळे यांनी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी कृषिभूषण नारायणबापू चौधरी यांना जबाबदारी देण्याचा मनोदय व्यक्त केला.
 
 
 
ज्वारी, कापूस शासकीय खरेदी केंद्र तात्काळ सुरू व्हावेत, पीक सरसकट घेण्यात यावें, पी एम किसान योजनेतील संगणक त्रुटीमुळे लाभार्थी योजने पासून वंचित आदी कृषी समस्या शेतकरी कार्यकर्ते यांच्याकडून मांडण्यात आल्या. या संवादात कृषिभूषण नारायण चौधरी, कृषी बाजार उपसभापती राकेश फेंगडे, ओवीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष हर्षल पाटील, गटनेते मिलींद वाघूळदे, संजय सराफ, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, पं.स.उपसभापती दीपक पाटील यांनी संवादात सहभाग घेतला. प्रास्ताविक शरद महाजन यांनी केले. आभार विलास चौधरी यांनी मानले. याप्रसंगी व्यासपीठावर खा.रक्षाताई खडसे , जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे, जि.प.शिक्षण सभापती रवींद्र पाटील, मसाका चेअरमन शरद महाजन, जि.प.सदस्य सविता भालेराव, नगराध्यक्षा महोले, माजी जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा रेल्वे समिती सदस्य डॉ.विजय धांडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, शहराध्यक्ष अनंता नेहेते उपस्थित होते. यावेळी माजी पं.स.सभापती भरत महाजन, जिल्हा दूध संचालक हेमराज चौधरी, शेतकरी खरेदी विक्री संस्था संचालक नितीन नेमाडे, पांडुरंग सराफ, डॉ नरेंद्र कोल्हे, उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, नितीन राणे, रवींद्र होले, रघुनाथ कुंभार, डॉ निलेश गडे, कामगार नेते किरण चौधरी ,अविनाश नेहेते, मीनल जावळे, संजय रल, संदीप भारंबे, पिंटू तेली, रामा होले, शेख अब्दुल्ला, रशीद तडवी, आरिफ शेख, निलेश पाटील,प्रतीक वारके, हेमंत भंगाळे, जितू वर्मा, संजय भावसार, यासह यावल तालुका शहर व फैजपूर शहरातील शेतकरी पदाधिकारी, शक्ती व बूथ प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते.