'नोटबुक' चित्रपटाच्या निर्मात्यांकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांना २२ लाख रुपयाची मदत
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :20-Feb-2019
 

 
 
१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच अनेकांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान खानच्या आगामी ‘नोटबुक’ या चित्रपटाचे निर्मातेही शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २२ लाख रुपये देणार आहेत.
 
 
‘सलमान खाननिर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटाचे अर्ध्याहून अधिक चित्रीकरण काश्मीरमध्ये झाले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना येथे तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनी कायम आमचे संरक्षण केले. त्यामुळे आम्ही निर्धास्तपणे आमचे चित्रीकरण पूर्ण करु शकलो. आज आपले संरक्षण करणारे हेच जवान आपल्यासाठी शहीद झाले आहेत. त्यामुळे आता आपण त्यांच्या कुटुंबीयांसाठी काही तरी करण्याची वेळ आली आहे. यासाठीच आम्ही हा मदतनिधी त्यांच्या कुटुंबीयांना देण्याचे ठरवले आहे’, असे निर्मात्यांनी सांगितले .
 
 
विशेष म्हणजे अभिनेता सलमान खान यानेदेखील त्याच्या ‘नोटबुक’ चित्रपटातून आतिफ अस्लम याने गायलेले गाणे हटविण्याची सूचना प्रोडक्शन हाऊसला दिल्या आहेत.