शिवजयंतीनिमित्त‘शिवदौड’
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :19-Feb-2019
 


 
शिरपूर, १८ फेब्रुवारी
मराठा व्यापारी संघटनेतर्फे शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला ‘शिवदौड’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. शहरातील पित्रेश्‍वर कॉलनी मैदानापासून सकाळी ७.३० वा. मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धा सुरू होईल. उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार चंद्रशेखर देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, मुख्याधिकारी अमोल बागुल, निरीक्षक संजय सानप, सांगवी पोलीस ठाण्याचे सपोनि किरणकुमार खेडकर, थाळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि विनोद पाटील, डॉक्टर्स संघटना, वकील संघटनेसह विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
 
 
असा आहे मार्ग : पित्रेश्‍वर कॉलनी, करवंद नाका, गुजराथी कॉम्प्लेक्स, पाच कंदील, एसपीडीएम महाविद्यालय, वाघाडी टी-पॉईंट, निमझरी नाका हे पाच किमीचे अंतर पूर्ण करून पुन्हा पित्रेश्‍वर कॉलनी मैदानावर मॅरेथॉनचा समारोप होणार आहे. तेथे विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके दिली जाणार आहेत. मॅरेथॉन पूर्ण करणार्‍या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. मार्गावर पाणी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 
 
जिजाऊ वॉक फॉर हेल्थ : महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी ‘जिजाऊ वॉक फॉर हेल्थ’ उपक्रमांतर्गत शहरातील युवती, महिला मॅरेथॉनपाठोपाठ चालणार असून पाच किमीचे अंतर पूर्ण करणार आहेत. यावेळी जिजाऊंचा सजीव देखावा सादर करण्यात येणार आहे.