रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाची डोकेदुखी वाढणार ?
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :18-Feb-2019

शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्री गाठणार

 
भुसावळ, १७ फेब्रुवारी
रावेर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक रविवारी दु ४:०० वाजता भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. याबैठकीत आगामी लोकसभा निवडणूक बाबत चर्चा करीत असतांना सर्वांच्या वतीने भाजपावर रोष व्यक्त करण्यात आला व रावेर लोकसभा मतदार संघ शिवसेनेसाठी सोडण्यात यावा असे एकमत देखील झाले.
 
 
युती झाल्यापासून ही जागा भाजप ला सुटलेली आहे त्यामुळे या मतदार संघातील शिवसेनेची वाढ खुंटली शिवाय भाजपचे खासदार शिवसेनेचे कोणत्याही पदाधिकार्‍याला विचारत न घेता निधी खर्च करतात. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो म्हणून रावेर लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेने करीता सोडण्यात यावी अशी मागणी पदाधिका़र्‍यांनी लावून धरली.
 
 
युती झालीच व भाजप ला जागा सोडल्यास विधानसभेत युती तोडण्यात आल्याची घोषणा माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी केली होती. त्याचा परिणाम या निवडणुकित जाणवेल असेही ठाम मत अनेक पदाधिकारी यांनी मांडले. शिवसैनिक युतीचे काम करणार नाही असे ठाम मत अनेक पदाधिकार्‍यांनी मांडले म्हणून येत्या गुरुवारी २१ फेब्रुवारी रोजी एक शिष्टमंडळ मातोश्री वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे .
 
 
या बैठकीत विलास मुळे (भुसावळ), डॉ मनोहर पाटील (जामनेर), अशोक पाटील (चोपडा), गोपाळ सोनवणे, महेंद्र शर्मा, अफसर खान, माजी जि.प. सदस्य दिलीप पाटील, विनोद पाडर, कडू पाटील , संतोष महाजन, तुकाराम कोळी, गुणवंत भोई, विजय चौधरी, चंद्रकांत शर्मा , सांडू मामा गुरव , सुधाकर सराफ, गणेश पांढरे, सुनील बारी, अप्पा चौधरी , विश्वनाथ कोळी, हिराशेठ राणे, आतिष सारवाण, प्रशांत भालशंकर, राजेंद्र तलेले, पी. के .महाजन यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.