बहुप्रतिष्ठित फिफाचे 'या' भारतीय खेळाडूंना निमंत्रण
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :18-Feb-2019
 

 
 
मुंबई : जगभरात प्रसिद्ध असलेला 'फिफा' फुटबॉल विश्वचषक २०२२ रोजी कतारमध्ये होणार आहे. क्रिकेटनंतर भारतात फुटबॉलही तेवढ्याच आवडीने पहिला जातो आणि खेळला जातो. यावेळी कतारमध्ये खेळण्यात येणाऱ्या फिफा २०२२च्या आयोजन समितील वरिष्ठ सदस्याने भारतीय क्रिकेट संघाला सामने पाहण्यास निमंत्रित केले आहे.
 
आयोजक नासीर अल खतेर म्हणाले, "२०२२ साली होणारा फुटबॉल विश्वकरंडक आपल्यासाठी एका उत्सवाप्रमाणे असणार आहे. भारतात क्रिकेट हा एवढा मोठा खेळ आहे, याचा अंदाज मला नव्हता. १९८३ साली विंडीज हरवून विश्वकरंडक जिंकलेला संघ आणि २०११ सालीच्या विश्वविजेत्या संघातील काही खेळाडू येथे उपस्थित आहेत. मी या सर्वांना फिफा विश्वकरंडक पाहण्याचे आमंत्रण देत आहे.
 
भारतात क्रिकेट हा सर्वात मोठा आणि लोकप्रिय खेळ आहे. कतार येथे होणाऱ्या फुटबॉल विश्वकरंडकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासीर अल खतेर यांनी या गोष्टीला लक्षात घेऊन क्रिकेट विश्वकरंडक जिंकणाऱया भारतीय संघाला निमंत्रण दिले आहे. भारताने १९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वात तर, २०११ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात विश्वकरंडक जिंकला होता. तसेच, धोनी हा फुटबॉलचा किती मोठा चाहता आहे हे सर्वश्रुत आहे.