पाकिस्तानवर मोठा सायबर हल्ला; भारतीय हॅकर्सकडून २००हुन अधिक साईट हॅक
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :18-Feb-2019
 
 
नवी दिल्ली-
भारतीय हॅकर्सच्या एका गटाने पाकिस्तानच्या जवळपास 200हून अधिक वेबसाइट्स हॅक केले आहेत. टीम आय-क्रूद्वारा हॅक करण्यात आलेल्या या वेबसाइट्स ओपन केल्यास पुलवामा हल्ल्यातील भारतीय शहिदांना श्रद्धांजली वाहिल्याचे निदर्शनास येत आहे आणि पेटती मेणबत्तीही नजरेस पडत आहे. तसेच भारतीय हवाई दलाची लढाऊ विमान तिरंग्याच्या रंगांमध्ये उडताना दिसत आहेत.
 
 
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना आमची श्रद्धांजली, असे या पेजवर लिहले आहे. तसेच पेजवर 14/02/2019चा हल्ला आम्ही विसरणार नाही सारखे संदेश लिहण्यात आले आहे. पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात ज्या जवानांनी प्राणांची आहुती दिली, त्या वीर जवानांना आम्ही आदरांजली वाहतो. आम्हाला माफ करा ?, आम्ही विसरून जाऊ ?, भारत हा हल्ला कधीही विसरणार नाही असे मेसेज या हॅक करण्यात आलेल्या पेजवर पाहायला मिळत आहे . पाकिस्तानी सायबर जगतातला हा सर्वात मोठा हल्ला आहे. तत्पूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचीही वेबसाइट हॅक करण्यात आली होती.