मतदान टक्केवारी वाढीसाठी युवकांची भूमिका महत्त्वाची : सिद्धेश्वर लटपटे
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :15-Feb-2019

 

 
जामनेर, १४ फेब्र्रुवारी
आगामी काळात देशात कोणी नेतृत्व करावे, यासाठी देशाची महत्त्वाची लोकसभा निवडणूक आहे, त्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आगामी काळात युवकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत सिद्धेश्वर लटपटे यांनी अभाविपच्या बक्षीस वितरण समारंभात व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर अभाविपचे पूर्व कार्यकर्ते रवींद्र झाल्टे, जिल्हा संयोजक प्रमोद सोनवणे, तालुका प्रमुख मनोज जंजाळ, कार्यक्रम प्रमुख शुभम मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पुढे बोलताना लटपटे म्हणाले की, विद्यार्थी परिषद प्रतिभा संगम, डिपेक्स, गुणवंत विद्यार्थी सत्कार, छात्र नेता संमेलन अशा विविध कार्यक्रम व उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करते. आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक म्हणून आपण समाजात ठोस भूमिका पार पाडावी, असे ही त्यांनी यावेळी सांगितले. १२ जानेवारीला युवक दिन व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धा यांच्या विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पारितोषिक व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. स्पर्धेत वकृत्व स्पर्धेत (प्रथम) योगिता चौधरी, (द्वितीय) दुर्गा रोकडे, (तृतीय) सूरज जाधव यांना व सामान्य ज्ञान स्पर्धेत, (प्रथम) अभिजीत जाधव, (द्वितीय) पंकज लहासे, (तृतीय) भूषण बनकर, (उत्तेजनार्थ) भारती झाल्टे.