मेहतर समाजाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :15-Feb-2019

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; भुसावळात राज्यातून २५ हजार समाजबांधव येणार

भुसावळ, १४ फेब्रुवारी
मेहतर वाल्मीकी, सुदर्शन समाजबांधवांसह सफाई कामगार संघटनांचे पहिले सामाजिक राज्यस्तरीय महाधिवेशन भुसावळ येथे येत्या २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री महोदय उपस्थित राहणार असल्याची माहिती गुरुवार रोजी माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष बारसे यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 
एक दिवस समाजकरिता आणि आपल्या परिवाराच्या उज्ज्वल भविष्याकरिता मेहतर वाल्मीकी, सुदर्शन, समाजबांधवांसह सफाई कामगार संघटनांतील समाजबांधव राज्यातील विविध जिल्ह्यांसह तालुक्यातून २५ ते ३० हजार पहिल्यांदाच भुसावळ शहरात आपल्या न्याय व हक्काकरिता एकत्र येणार आहे. या मेळाव्याचा मूळ उद्देश समाज संघटन, समाज उन्नती, शैक्षणिक विकास यासह समाजबांधवांच्या विविध समस्या सोडविण्याकरिता हे अधिवेशन आहे. हे कोणतेही राजकीय अधिवेशन नसून उपेक्षित असलेल्या समाजाच्या विविध मागण्यांकरिता हे अधिवेशन घेण्यात येत असल्याचे बारसे यांनी यावेळी सांगितले. २१ रोजी दुपारी १२ वा. जामनेर रोडवरील टीव्ही टॉवर मैदान, नवशक्ती व्यापारी संकुलनाच्या पाठीमागे होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांच्या जिल्ह्याजिल्ह्यातून व गावोगावात बैठकी घेण्यात येत असून जास्तीत जास्त समाजबांधवांनी अधिवेशनास यावे, असेही नियोजन करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या नियोजनाकरिता ज्येष्ठ कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये रामा जेथे, रुपसिंग पथरोड, राजू खरारे, किशन गोडाले आदी आणि युवक कृती समितीमध्ये संतोष बारसे, सुनील पवार, संजय चव्हाण, गब्बर चावरिया, सुरेश ढंढोरे यांच्यासह युवकांचा समावेश आहे. या अधिवेशनाला पहेलवान पुत्र ग्रुप यांचे सहकार्य लाभत आहे. अधिवेशन यशस्वितेसाठी पहेलवान पुत्र ग्रुप अध्यक्ष संतोष बारसे, नगरसेविका सोनी संतोष बारसे, यांच्यासह समिती परिश्रम घेतात आहे. पत्रकार परिषदेस राजू खरारे, हरीश धनवड, गब्बर चावरिया, संजय चव्हाण, मोहन घारू, शंकर कलोसिया, दिनेश बालुरे आदींची उपस्थिती होती.
 
यांची राहणार उपस्थिती
अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, खा.रक्षाताई खडसे, खा.ए.टी. पाटील, आ. संजय सावकारे, आ. हरिभाऊ जावळे, आ. सुरेश भोळे, आ.उन्मेष पाटील, आ. किशोर पाटील, आ.शिरीष चौधरी, आ.चंद्रकांत सोनवणे, आ. सतीश पाटील, आ. चंदुलाल पटेल, सफाई कर्मचारी आयोगाचे रामोजी पवार, नगराध्यक्ष रमण भोळे, लक्ष्मी मकासरे, प्रा. डॉ.सुनील नेवे, यांच्यासह भुसावळ नगरपालिकेतील सर्व नगरसेवक व नगरसेविका यांची उपस्थिती लाभणार आहे.