शैक्षणिक क्षेत्रात पी.बी.पाटील यांचे कार्य उल्लेखनीय : चिमणराव पाटील
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :15-Feb-2019
पारोळा, १४ फेब्रुवारी
कै. तात्यासाहेब रु. फ. पाटील शिक्षण मंडळाचे माजी सचिव व बोळे येथील महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. बी. पाटील यांचे संस्थेच्या विस्तारात मोलाचे योगदान असून संस्थेच्या सर्व शाळांमध्ये शिस्त, परिपाठ संकल्पना, नावीन्यपूर्ण उपक्रम यामुळे त्याच्या संस्कारात घडलेले विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय असल्याचे मत माजी आ. चिमणराव पाटील यांनी व्यक्त केले.
 
 
देवगाव येथे संस्थेच्या वतीने आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते.
व्यासपीठावर चतुर पाटील, जिजाबराव पाटील नगरसेवक प्रमोद पाटील, मनोहर पाटील, समीर पाटील, आधार पाटील, नानाभ गिरासे, सखाराम चौधरी, मोरेश्वर पाटील, सुनील पाटील, नलिनीताई पाटील, डॉ. नर्मदा ठाकरे उपस्थित होते.
 
 
यशस्वितेसाठी जी.जे.पाटील, संदीप पाटील, दीपक नावरकर, सुभाष पाटील, दीपक पाटील (भडगाव), आर. एम. पाटील, गणेश जाधव, प्रवीण बिरारी व संस्थेच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आर.ए.पाटील यांनी आभार नंदकुमार पाटील यांनी व्यक्त केले.