गरुड महाविद्यालयात ‘राष्ट्रीय जीएसटी’ परिषद
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :15-Feb-2019

राष्ट्रीय स्तरावरील संशोधकांचा सहभाग, शोधनिबंध संकलन स्मरणिकेचे प्रकाशन

 
 
 
शेंदुणी, ता. जामनेर १४ फेब्रुवारी
येथील गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथे जीएसटी या विषयावर राष्ट्रीय परिषद झाली. जीएसटीचे विषयक राष्ट्रीय स्तरावरील संशोधकांनी यात सहभाग घेतला. महाविद्यालयीन गीत जीवन राठोड प्रतीक्षा गुजर व काजल चव्हाण यांनी गायिले. प्रास्ताविक परिषदेचे सचिव डॉ.वसंत पतंगे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते शोधनिबंधांचे संकलन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर दी शेंदुर्णी सेकं. एज्यु.चे अध्यक्ष संजय गरुड यांनी मनोगतातून कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने महाविद्यालयास यजमानपद दिल्याबाबत आभार व्यक्त केले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सदर परिषदेसाठी शुभेच्छा संदेश पाठविला होता. या संदेशाचे वाचन उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे यांनी केले. प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील यांनी संस्था ७५ वर्ष वाटचाल पूर्ण करीत असून राष्ट्रीय जीएसटी परिषदेचा योग सुदैवाने आला. याबाबत सर्वांचे आभार मानले. उद्घाटक प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, फैजपूर यांनी परिषदेचे उद्घाटन झाल्याची उद्घोषणा केली. दी शेंदुर्णी सेकंडरी एज्यु.को-ऑपचे ज्येष्ठ संचालक यू. यू. पाटील यांनी जीएसटीमुळे करप्रणाली एका छताखाली आली.हा बदल क्रांतिकारी परंतु तरीही अभिनंदनीय असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव सागरमल जैन यांनी ‘वक्त को वक्त दो, वक्त बदल सकता है’ असे शायरीतून सांगितले. जीएसटीच्या बाबतीत लघुव्यावसायिकांमध्ये आजही जाणीव जागृती करणे गरजेचे आहे, असे अध्यक्षीय समारोपातून स्पष्ट केले. संस्थेचे सहसचिव दीपक गरुड यांनी परिषदेस शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर डॉ. सबत डिगल (ओरिसा), डॉ. मुकर्रम खान (गुजरात), उपप्राचार्य प्रा.एन.एस.सावळे, उपप्राचार्य प्रा. आर.जी. पाटील, उपप्राचार्य डॉ. संजय भोळे, जीएसटी विषयक मार्गदर्शनपर शोधनिबंधांचे स्वतंत्र सत्रांमध्ये सादरीकरण केले. सूत्रसंचालन डॉ. दिनेश पाटील यांनी केले. गरुड महाविद्यालयाचा धरमसिंह देसाई विद्यापीठ नडियालच्या कॉमर्स इन्स्टिट्यूटसोबत विद्यार्थी - प्राध्यापक विचार सहकार्य करार करण्यात आला. प्रारंभी डॉ. सबत डिगल यांनी बीजभाषणातून जीएसटीच्या मूळ संकल्पनेला स्पर्श करीत मार्गदर्शन केले. परिषदेच्या यशस्वितेसाठी प्रा. अमर जावळे, डॉ. आर. आर. चव्हाण यांनी पोस्टर प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यकारी अधिकारी सतीश बाविस्कर, मुख्य लिपिक हितेंद्र गरुड, प्रसिद्धी विभागाचे प्रा. भूषण पाटील डॉ.ए.एन.जिवरग यांनी कामकाज पाहिले. डॉ. आर. आर. चव्हाण, जळगाव व डॉ. एस.व्ही.गंडे, जालना, डॉ. एस. डी. तळेकर यांनी मनोगते व्यक्त केली. समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी बोदवडच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी होते. ते म्हणाले की, आपल्या देशातील प्रत्येकात जर प्रामाणिकपणा असेल तर करसक्तीची गरजच उरणार नाही. आभार डॉ. योगिता चौधरी यांनी मानले. प्रा.ए. एस. महाजन, डॉ. आर. डी. गवारे, प्रा. डी.एच. धारगावे प्रा. एस.जी.डेहरकर, प्रा. निरुपमा वानखेडे, प्रा.पी.जे. सोनवणे, प्रा. दीपक पाटील, प्रा. रिना पाटील, प्रा. वर्षा लोखंडे, प्रा. संदीप कुभार, प्रा. वर्षा पवार, प्रा. सुलेखा निकम, प्रा. प्रतीक्षा गायकवाड, राजेंद्र संदानशिव, सरला गरुड, लक्ष्मण सोनवणे, सतीश पाटील यांनी परिश्रम घेतले.