आशा फाउंडेशनतर्फे विनामूल्य सूत्रसंचालन कार्यशाळा
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :15-Feb-2019
 

 
 
जळगाव, १४ फेब्रुवारी
आशा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ‘उन्नतीसाठी दस्तक’ या महिलांच्या स्वप्न साकारणार्‍या उपक्रमांतर्गत २० ते २८ फेब्रुवारीदरम्यान विनामूल्य सूत्रसंचालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या महिलांना विशेषतः गृहिणींना या संधीचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आशा फाउंडेशन, प्लॉट नं. ११/अ, महाबळ कॉलनी, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक गिरीश कुळकर्णी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
 
 
या उपक्रमांतर्गत प्रथम महिलांची स्वप्ने जाणून घेण्यात येतात तसेच ही स्वप्ने का पूर्ण होऊ शकली नाहीत, त्याची कारणे काय हे समजून घेण्यात येते. स्वप्न पूर्ण व्हावे, असे का वाटते आणि स्वप्नपूर्तीनंतर काय करणार हे जाणून घेण्यात येते. आतापर्यंत अनेक महिलांनी दुचाकी शिकायची, स्वतःच्या पायावर उभे राहायचे, शिक्षण पूर्ण करायचे, नोकरी करायची, ब्युटी पार्लर चालवायचे, कॉम्प्युटर, मोबाईल, गायन, वादन, नृत्य शिकणे स्वप्न असण्याचे सांगितले आहे. संस्था या स्वप्नपूर्तीसाठी कार्यरत आहेत. त्याचा एक भाग म्हणून ज्या महिलांना सूत्रसंचालन करावयाची इच्छा आहे, अशांसाठी ८ दिवसांची कार्यशाळा घेणार आहे. प्रथम येणार्‍या २० महिलांनाच यात प्रवेश देण्यात येणार असल्याने ज्या गृहिणींनी आपली नावे नोंदविली नसतील त्यांनी त्वरित आपला प्रवेश निश्चित करावा, असेही पत्रकात पुढे म्हटले आहे. अधिक माहितीसाठी वसुधा सराफ ८२०८११४०७२ वर संपर्क साधावा.