राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत डॉ.वृषाली पाटील यांना सुवर्णपदक
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :15-Feb-2019
 
 
 
जळगाव, १४ फेब्र्रुवारी
अ.भा.बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने गोवा येथे ४३ व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जळगावच्या डॉ.वृषाली पाटील नाहिद दिवेचा या जोडीने ४५ वर्षावरील गटात विजेतेपदासह सुवर्णपदक प्राप्त केले. ४५ वर्षावरील दुहेरीच्या गटात राष्ट्रीय स्पर्धेत ३२ प्रवेशिका होत्या. निकाल पुढीलप्रमाणे- शिखा खुंडरी व अजिता रविंद्रन या जोडीचा २१/१५, २१/१९, श्रीदेवी गांधीली व रूचिता शर्मा जोडीचा २१/१३, १६/२१, २३/२१, दीपाली जोशी व चैत्राली नवरे जोडीचा १०/२१, २१/१४,२१/१७ अंतिम सामन्यात डॉ.वृषाली पाटील व नाहिद दिवेचा जोडीने काजल धनवानी व रचना गर्ग (गुजरात) जोडीचा २१/८/,२१/१० असा पराभव करून ‘सुवर्णपदक’ पटकावले. डॉ.वृषाली पाटील यांची ऑगस्ट २०१९ मध्ये होणार्‍या ‘जागतिक केटरन्स बॅडमिंटन’साठी भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धा पोलंड येथे होणार आहेत. या यशाचे श्रेय डॉ. वृषाली पाटील त्यांचे प्रशिक्षक दीपक आर्डे यांना देतात.
जिल्हा के्रटरन्स बॅडमिंटन खेळाडूंनी व पदाधिकार्‍यांनी त्यांचे कौतुक केले.