भुसावळात ट्रकचालकाला मारहाण : ३६ हजार लुटले
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :14-Feb-2019
 
भुसावळ, १३ फेब्रुवारी
जामनेर रोडवरील डॉ. भिरुड हॉस्पिटलसमोर ट्रकसमोर दुचाकी आडवी लावून ट्रकचालकास बेदम मारहाण करत त्याच्याजवळील ३६ हजार ५०० रुपये जबरदस्तीने नेल्याची घटना बुधवार, १३ रोजी घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ट्रकचालक इम्रान मोहंमद गफ्फार मोहंमद (वय २६ रा. सलुंबर ता. सलुंबर जि. उदयपूर, राजस्थान) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
ट्रकचालक इम्रान मोहम्मद गफ्फार मोहम्मद (वय २६, रा.सलुंबर, ता.सलुंबर, जि.उदयपूर, राजस्थान) हे आपला ट्रक (एम.एच.१८बी.जी.५१७१) घेऊन जात असताना ट्रकसमोर अनोळखी इसमांनी बजाज डिस्कवर दुचाकी आडवी लावून ट्रकमध्ये चढून क्लीनर वानजी कानजी मीना यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करून दुसर्‍या हातातील कड्याने व दगडाने मारहाण करून दुखापत केली. दरम्यान, ट्रकचालकाच्या पँटच्या खिशातील पाकीट हिसकावून रोख ३६ हजार ५०० रुपयांची जबरी लूट केली. पुढील तपास पो.नि.देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.दत्तात्रय गुळींग करीत आहे.