अमळनेर मतदारसंघात विकासकामांसाठी १० कोटी
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :14-Feb-2019

आ. शिरीष चौधरी यांची माहिती, विविध ठिकाणी होणार कामे

 

 
 
अमळनेर, १३ फेब्रुवारी
येथील मतदारसंघात अमळनेर व पारोळा तालुक्यातील गावांमध्ये विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला असून यामुळे विकासाचा अनुशेष भरून निघणार आहे. आता पुन्हा मतदारसंघातील ग्रामपंचायत, रस्ता कॉंक्रिटीकरण, गटार, सभागृह, सभामंडप, स्मशानभूमी, प्रवेशद्वार, शौचालय आदी विकासकामांसाठी १० कोटी ६० लाख एवढा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आ. शिरीष चौधरी यांनी दिली आहे.
 
 
यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री ना. पंकजाताई मुंडे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभल्याने आ. चौधरी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या निधीतून ग्रामपंचायत इमारत :-हिरापूर, दोढवद, भोलाने, सुमठाणे, खापरखेडा, झाडी, कलाली.
 
 
गाव प्रवेशद्वार:-कपिलेश्वर मंदिर नीम, नीमझरी, नगाव खुर्द, रडावण, हिंगोनासिम, जुनोने, दगडी सबगव्हाण, मुगसे, धानोरा, एकरुखी, लोणे, मेहेरगाव, खेडी (खवशी).
 
 
संरक्षक भिंत:- मुंगसे, दोधवद, पिंगळवाडे, अमळगाव.
पेव्हर ब्लॉक बसविणे:-भरवस, झाडी, कळंबू येथे हनुमान मंदिर परिसर व राम मंदिर चौक. समाजमंदिर/देवमढी :-पुनगाव, मुडी (हिंगोणे), पाडळसे, महाळपूर, मुंगसे, ढेकू खु., शेळावे, चोंदी (बोदर्डे), ढेकू, चिमणपुरी, नीम, खेडी व्यव हारदाळे, खापरखेडा, करणखेडा, कामतवाडी, कळंबे, तांबोळे, निमझरी, दापोरी, बहादरपूर, सारबेटा खु., गलवाडे बु. गावांतर्गत रस्ता कॉंक्रिट, गटारी, सभामंडप, सभागृह, शौचालय, स्मशानभूमी करणे:-अमळगाव स्मशानभूमी साठी २० लाख, इंदापिंप्री, जळोद, मुडी, एकरुखी, जळोद, लोण बु., धावडे, निसर्डी, पाडळसे, जैतपीर, भिलाली, वसंतनगर, सारबेटा बु., पिंपळकोठा, खवशी, नगाव खु., करणखेडा, तांबोळे, एकतास, शिरसाळे, बहादरपूर, जळोद, कळमसरे, तांदळी, नीमझरी, पाडळसे, सावखेडा, जिराळी, जानवे, मालपूर, गलवाडे, जवखेडे, शहापूर येथे गोरेश्वर मंदिर परिसर कॉंक्रिटीकरण करणे. दळवेल, नीम, शिरूड, पिळोदा, पातोंडा, मारवड, शेवगे बु., उत्राण, पातोंडा, मेहेरगाव, नीमझरी, दहिवद, दगडी सबगव्हाण, बाह्मणे, पिपळे खु., गडखाब, खेडी खु., मोढाळे, हिवरखेड तांडा, दगडी सबगव्हाण, हिंगोणा खु., पिंपळी, मोढाळे, आर्डी अनोरे, पाडसे, खवशी, रत्नापिंप्री, देवगाव देवळी, शिरसोदे, मांडळ, रणाईचे, भरवस, मुडी प्र. डा., शहापूर, नगाव खु., धार, जवखेडे, ढेकूसिम, वावडे, गांधली, गलवाडे, सारबेटे, डांगरी, निंभोरा, कोळपिंप्री, जानवे, गडखांब, टाकरखेडा, दळवेल, शिरूड, दहिवद, झाडी, भिलाली, ढेकू खु., मंगरूळ, शेवगे बु., जैतपीर, नगाव बु., आबापिंप्री आदी ठिकाणी विकासकामे होणार असून कार्यकारी यंत्रणा ही सार्वजनिक बांधकाम विभागाची राहणार असल्याचे आ. चौधरी यांनी सांगितले. यामुळे ग्रामीण भागात आवश्यक ती विकासकामे मार्गी लागणार असून याचा लाभ ग्रामस्थांना होणार आहे. ग्रामीण भागातील गावांतर्गत सुविधांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ. शिरीष चौधरी यांनी शासनाकडे अजून प्रस्ताव दाखल केला असून यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत, सभामंडप, सभागृह, कॉंक्रिट रस्ता, गटारी, प्रवेशद्वार, आदिवासी समाजमंदिर, संरक्षक भिंत, स्मशानभूमी, दफनभूमी आदी कामे प्रस्तावित आहेत. लवकरच त्यांना मंजुरी मिळेल आणि विकासाचा आलेख अजून वाढेल, असा विश्वास आ. चौधरी यांनी व्यक्त केला आहे.