‘मेरा परिवार, भाजपा परिवार’ भालोदला अभियान जल्लोषात
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :14-Feb-2019
 

 
 
फैजपूर, १३ 
भारतीय जनता पार्टीचे पूर्वघोषित राष्ट्रीय अभियानांतर्गत मेरा परिवार भाजपा परिवार हा उपक्रम १२ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपल्या घरावर दर्शनी भागात भारतीय जनता पार्टीचे ध्वज व स्टिकर लावायचा आहे.
 
 
या अभियानांतर्गत यावल तालुक्यात भालोद येथे आ. हरिभाऊ जावळे यांनी आपल्या निवासस्थानी पक्षीय ध्वज लावून उपक्रमाची जल्लोषात सुरुवात केली. याप्रसंगी आ. जावळे सपत्नीक कल्पना जावळे, सुमन जावळे, कृषिभूषण नारायण चौधरी, भाजपा अध्यक्ष मीनल जावळे, प्रा डॉ. जतीन मेढे, स्वीय सहाय्यक मयूर कोल्हे आधी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.