वाढदिवसाच्या दिवशी झाला अपघात, जखमीची मृत्यूशी झुंज

    दिनांक : 09-Dec-2019
पाचोरा : शहरातील बनोटीवाला फार्म हाऊस पुढे दि.५ रोजी सायंकाळी भडगांवहून मोटरसायकलवर भडगांव येथील आपल्या घरी येत असताना त्याचा अपघात झाला. घरी नातेवाईक व आई वडील वाढदिवस असल्याने वाढदिवस साजरी करण्यासाठी वाट पाहत होते. परंतु, घरी अपघाताचीच बातमी पोहचल्याने महाजन कुटुंबीयांवर शोक कळा पसारली. ग्रामस्थांना हि या घटनेने धक्का बसला. 

b_1  H x W: 0 x 
 
 
महाजन मेडिकल चे संचालक ऋषिकेश संभाजी महाजन (वय २१) पाचोरा येथे घरी येताना बनोटीवाला फार्म हाऊस पुढे त्यांचा पघात झाला. पाचोऱ्याकडुन भडगांव कडे जाणार्‍या भरधाव वेगात असलेल्या पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट गाडीने जोरदार धडक दिली. यात ऋषिकेश महाजन गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत पारोळा येथील कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील, अॅब्लुलन्स चालक निलु पाटील यांनी विघ्नहर्ता मल्टीस्पेशलीस्ट हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी भर्ती केले. डॉक्टरांनी त्याच्यावर तत्काळ उपचार सुरु केले. परंतु, डोक्याची कवटी फुटल्याने कॉग्रेसचे आरोग्यदुत सचिन सोमवंशी यांनी तातडीने औरंगाबाद हलविण्याचा निर्णय घेतल्याने औरंगाबाद येथील एम्स हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
 

b_1  H x W: 0 x 
 
ज्या दिवशी अपघात झाला त्याचदिवशी ऋषिकेश महाजन याचा वाढदिवस होता. त्याचे वडील डॉ. संभाजी महाजन आणि कॉलनीतील रहीवाशी हे केक कापण्यासाठी वाट बघत असतांनाच त्याच्या अपघाताचे वृत्त घरी पोहचताच सर्वांनी हॉस्पिटल कडे धाव घेतली. औरंगाबाद येथे ऋषिकेश महाजन याची मृत्यूशी झुंज सुरू असुन पोलिसांनी मोटारसायकल जप्त केली आहे, तर स्विफ्ट कार चा शोध सुरू आहे.