सरकार नवीन आहे,वेळ जरूर देणार; पण...

    दिनांक : 09-Dec-2019
मुंबई: विधानसभा निवडणुका झाल्यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडीत बहुमतापासून चुकलेल्या भाजपला मोठा पक्ष ठरूनही विरोधी पक्षात बसावे लागले आहे. मित्र पक्ष शिवसेनेने दगा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकारही स्थापन झाले आहे. परंतु अकरा दिवस उलटून गेल्यानंतरही मंत्रीमंडळ स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

b_1  H x W: 0 x 
 
या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले कि नव्या सरकारला स्थापन होऊन आठ दिवस उलटून गेले आहेत तरीही त्यांचे मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकले नाहीये. विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला भेटून सांगितले कि तुम्ही माझे मित्र आहात, आम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे. त्यामुळे मी त्यांना वेळ द्यायचे ठरवले आहे. नवीन सरकार आहे. स्थिर व्हायला वेळ लागतो. तो वेळ आम्ही त्यांना जरूर देऊ. त्यानंतर त्यांनी राज्याचा गाडा हाकण्यास लवकर सुरुवात करावी. नवीन सरकार जनतेच्या विरोधात निर्णय घेतील तर त्याला जरूर विरोध करीन. पण मी त्यांना वेळ द्यायचा ठरवले आहे. अश्या शब्दात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व्यक्त झाले आहे.