...म्हणून पंकजा मुंडे भाजपच्या बैठकीस अनुपस्थित !

    दिनांक : 09-Dec-2019
मुंबई: भाजपच्या विभागीय बैठकीत आज पंकजा मुंडे अनुपस्थित होत्या. त्यामुळे त्यांच्या गैरहजर राहण्यामागे नेमकं कारण काय असावं? याचीच चर्चा सध्या औरंगाबाद आणि परळीत होत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पंकजा मुंडे आजारी आहेत. त्यांनी माझी परवानगी घेतली आहे. तब्येत बरी नसल्याने त्या या बैठकीला येऊ शकल्या नाहीत, असं चंद्रकातं पाटील म्हणाले.

ब_1  H x W: 0 x 
 
भाजपची मराठवाडा विभागाची आढावा बैठक सध्या औरंगाबादमध्ये झाली. चंद्रकांत पाटील आणि इतर पदाधिकारी यांनी मराठवाड्यातल्या पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीविषयीही या बैठकीत चर्चा केली गेली. मात्र या बैठकीला भाजपच्या मराठवाड्यातील पंकजा मुंडे या गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आलंय. भाजपचा एक मोठा गट पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात घडत आहेत. यात एकनाथ खडसे, विनोद तावडे यांचंही नाव आघाडीवर आहे. खडसे या नाराज नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यामुळे हा नाराज गट काही वेगळा विचार करू शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.