'ही' महिला ठरली जगातील सर्वात तरुण पंतप्रधान

    दिनांक : 09-Dec-2019
सना मारिन या फिनलँडच्या नव्या पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांचे वय केवळ 34 आहे. साऊली निनिस्तो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनाम दिल्यानंतर मारिनोंची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतू सना मरीन या फिनलँड च्या पंतप्रधान झाल्या आहेत.

m_1  H x W: 0 x 
 
 
सना मरीन यांनी पंतप्रधान पदाची धुरा हाती घेताच विश्व विक्रम रचला आहे. त्या जगातील सर्वात तरुण पंतपधान बनल्या आहेत. त्या या आधी परिवहन आणि दळणवळण मंत्री राहिल्या आहेत. सर्वात तरुण पंतप्रधान बनण्याचा विक्रम युक्रेनचे पंतप्रधान आलेक्सी होन्चेरुक यांच्या नावे होता. तो मरीन यांनी मोडीत काढला आहे.
पंतप्रधान पदासाठी निवड झाल्यानंतर मारिन यांनी सांगितले की, मी कधीही वय आणि स्रीत्वाचा विचार केला नव्हता. मी केवळ राजकारणात येण्याची कारणे आणि मतदारांनी मला कशाला निवडून दिले आहे याचा विचार करते.
फिनलँडमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. पोस्ट कर्मचाऱ्यांनी मोठा संप पुकारला होता. 700 कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याच्या निर्णयाने राजकीय संकट निर्माण झाले होते. यामुळे रिन्ने यांना पायऊतार व्हावे लागले होते. तर आंदोलनानंतर विश्वासार्हता गमावल्याने साऊली निनिस्तो यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.