राष्ट्रीय छात्र सेने मार्फत प्लास्टिक विल्हेवाट मोहीम

    दिनांक : 07-Dec-2019
धरणगाव : येथील राष्ट्रीय छात्र सेनेच्या एडिशनल डायरेक्टर जनरल (ADG) मुंबई यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी,अधिकारी दिनाक १ ते १५ डिसेंबर १९ हा स्वच्छता पंधरवडा साजरा करीत आहेत. या पंधरवड्यात स्वच्छते बाबत विविध उपक्रम राबविण्याचे काम सुरू असून यातून समाज प्रबोधन व्हावे हा देखील एक उद्देश आहे. या कार्यक्रमानुसार येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि पि आर हायस्कूल मधील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट यांनी आज सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. यासाठी विद्यालयातून प्लास्टिक जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात मुख्याध्यापक प्रा बी एन चौधरी , उपप्राचार्य डॉ किशोर पाटील, उपमुख्याध्यापक संजय अमृतकर, पर्यवेक्षक डॉ संजीव कुमार सोनवणे, यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

न_1  H x W: 0 x 
 
साने पटांगणावर, कोट बाजार येथे रॅली पोहचल्यानंतर तेथे कोट बाजार आवारात असलेला प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला. एकत्रित केलेले प्लास्टिक पिशव्या , अन्य वस्तू यांना जाळून विल्हेवाट लावण्यात आली. सब्जी मंडई मध्ये हा उपक्रम राबविण्यात आल्याने अनेकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा संकल्प केला. याच ठिकाणी मेजर अरुण वळवी, चीफ ऑफिसर डी. एस. पाटील यांनी प्लास्टिकचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परिसरात असलेल्या नागरिकांना, व्यावसायिकाना प्लास्टिक वापरावर निर्बंध घालण्याची आवाहन केले. प्रत्येक नागरिकाने, विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा ,बाजारात या पिशव्यांमध्ये वस्तू न घेण्याचा निर्णय घेतला आणि चुकून प्लास्टिक चा वापर केलाच तर सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक फेकणार नाही त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याचा संकल्प केला.