कोअर कमिटीच्या बैठकीसाठी भाजप पदाधिकारी जळगावात

    दिनांक : 07-Dec-2019
जळगाव - जळगावात आज विभागीय कोअर कमिटीच्या निमित्ताने भाजपचे [प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शहरात दाखल झाले आहेत. भाजपकडून पक्षातील नाराज असलेल्या नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांची मनधरणी साठी हा सारा आटापिटा सुरु असल्याची चर्चा आहे.

न_1  H x W: 0 x 
 
भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांच्या विभागवार बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. पण उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या बैठका खडसे आणि महाजन यांच्या कार्यकर्त्यांमधील कोल्डवॉरमुळे पोलीस संरक्षणात होत आहेत. पक्षातील नेत्यांनीच माजी मंत्री पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पाडल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. महाजन-खडसे गटाचे वैर सर्वश्रुत आहे. त्यातच काल पत्रकार परिषदेत आ. गिरीश महाजन यांनी खडसेंना ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांचे नावे जाहीर करा असे आवाहन केल्यामुळे त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहावे लागेल. दुपारी उशिरापर्यंत एकनाथ खडसे आपली कन्या रोहिणी खडसे व स्नुशा खा. रक्षा खडसे यांच्यासोबत पोहचले होते.