विराट कोहलीच्या तुफानी खेळीमुळे भारताचा पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात विजय !

    दिनांक : 07-Dec-2019
वेस्ट इंडीज कडून मिळालेले २०८ धावांचे आव्हान भारतीय संघाने ८ चेंडू बाकी ठेवत पूर्ण केले व पहिला टी-ट्वेंटी सामना आपल्या नावे केला आहे. कर्णधार विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर यजमान भारतीय संघाने शुक्रवारी वेस्ट इंडीजवर सहा गडी व आठ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीची तुफानी खेळी यात निर्णायक ठरली.

n_1  H x W: 0 x 
 
वेस्ट इंडीजकडून मिळालेल्या 208 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने अवघे चार गडी गमावत विजयी लक्ष्य पार केले. खॅरी पियरने रोहीत शर्माला आठ धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला. त्यानंतर लोकेश राहुल व विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची दमदार भागीदारी रचत टीम इंडियाला विजया पर्यंत पोहचवले. हि जोडी पुन्हा खॅरी पियरने लोकेश राहुलला 62 धावांवर बाद करून तोडली.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले होतेक्षेत्र रक्षण करताना भारताकडून वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डला सलग तीन चेंडूवर तीन जीवदान दिले. त्याचाही फटका बसला. शिमरोन हेथमायरने ही 56 धावांच्या खेळीच्या जोरावर 207 धावा तडकावल्या. एविन लुईसने 40 धावांची, बी किंगने 31 धावांची, कायरॉन पोलार्डने 37 धावांची खेळी केली.
विराट कोहलीने लोकेश राहुल बाद झाल्यानंतर रिषभ पंत (18 धावा), श्रेयस अय्यर (4 धावा) यांच्या साथीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने 50 चेंडूंत सहा षटकार व सहा चौकार मारत नाबाद 94 धावांची खेळी साकारली आणि यजमान देशाचा विजय निश्चित केला.