दुष्कृत्य करणाऱ्यासोबत हीच कारवाई व्हावी - बाबा रामदेव

    दिनांक : 06-Dec-2019
नवी दिल्ली :  आज पहाटे हैदराबाद येथील दिशा बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी चकमकीत मारल्या प्रकरणी देशभरात पोलींसांच्या कृतीचे समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया उमटत आहे.  योगगुरू रामदेव बाबा यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले. अशाप्रकारचे अपराधी आपल्या समाजासाठी कलंक असतात. संपूर्ण देश आणि धर्म, संस्कृती अशा लोकांमुळे बदनाम होत असते. असे ते म्हणाले आहेत.
 
 
ग_1  H x W: 0 x
 
 
पहाटे 3 च्या दरम्यान हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एनकाऊंटरमध्ये ठार झाले. त्यांना पोलीस अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी बंदुक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पण त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यावेळी गोळीबार करण्यात आला. आता या घटनेवर सर्वच स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहे.
 
योगगुरू बाबा रामदेव पुढे म्हणाले, जे  लोक दुष्कृत्य करतात त्यांच्यासोबत आणि दशतवाद्यांविरोधात त्याच ठिकाणी पोलिसांना, सैन्याला आणि निमलष्करी दलाला अशीच कारवाई करायला हवी, असे परखड मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केले. एखाद्या घटनेबाबत काही साशंकता असेल न्यायालयापर्यंत त्या घटना नेल्या पाहिजेत. कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब त्यावेळीच केला पाहिजे. अशाच प्रकारची कारवाई बलात्कारी आणि दहशतवाद्यांवर झाली पाहिजे. ज्या घटनांबाबत साशंकता असेल तेव्हाच न्यायालयात जायला हवे, असल्याचे म्हणत त्यांनी या एनकाऊंटरचे समर्थन केले आहे..