भावी पिढीसाठी मृदा संवर्धन गरजेचे- आ. मंगेश चव्हाण

    दिनांक : 06-Dec-2019
Total Views |
चाळीसगाव: जागतिक मृदा दिनानिमित्त पंचायत समिती DRDA हॉल येथे कृषी विभाग चाळीसगाव तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मंगेशदादा चव्हाण होते. पुढच्या पिढी साठी मृदा संवर्धन गरजेचे आहे . आरोग्यासाठी साठी चांगल्या मातीतील सकस धनधान्य निर्माण होऊ शकते. आपण सारे मातीतील लोकं आहोत. मातीच्या आरोग्यासाठी आपण सारे मिळून काम करूया, असे आपल्या भाषणा दरम्यान त्यांनी मनोगत व्यक्त केले.

j_1  H x W: 0 x 
 
 
आमदार मंगेश चव्हाण पुढे म्हणाले कि, पुढच्या पिढी साठी मृदा संवर्धन गरजेचे आहे. आरोग्यासाठी साठी चांगल्या मातीतील सकस धनधान्य निर्माण होऊ शकते. आपण सारे मातीतील लोकं आहोत मातीच्या आरोग्य साठी आपण सारे मिळून काम करूया असे आवाहनही त्यांनी केले. माती प्रयोगशाळेत तयार होऊ शकत नाही मातीचा एक एक कण तयार होण्या साठी हजारो वर्षे लागतात. सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी केमिकलचा वापर कमी होण्यासाठी मातीचे संवर्धन होणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले. कृषी विकासासाठी चांगले काम करणाऱ्या लोकसेवक कर्मचाऱ्यांचा सत्कार करून पुढील वर्षापासून मोठ्या प्रमाणात मृदा दिन साजरा करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. यावेळी दिनेशभाऊ बोरसे, संजय तात्या पाटील, साठे साहेब यांनी देखील मृदा दिनाच्या अनुषंगाने आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रम प्रसंगी दिनेशभाऊ बोरसे, संजय तात्या पाटील, साठे साहेब यांनी देखील मृदा दिनाच्या अनुषंगाने आपली मनोगते व्यक्त केली. पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, उपसभापती संजय तात्या पाटील, तालुका कृषी अधिकारी सी.डी. साठे साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी अजय पवार, तंत्रज्ञान व्यवस्थापक ज्ञानेश्वर पवार, तंत्र सहाय्यक ए.आर.चंदिले, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश महाजन, धनंजय मांडोळे, अनिल नागरे, भैय्यासाहेब पाटील, संजय पाटील व शेतकरी बांधव उपस्थित होते.