रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यु

    दिनांक : 05-Dec-2019
रावेर: तालुक्यातील निंभोरा स्टेशन नजीक धावत्या रेल्वे गाडीतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

l_1  H x W: 0 x 
 
तपासी अंमलदार त्रंबक वाघ व हे. कॉ. नरेंद्र लोढे यांनी निंभोरा स्टेशन जवळील घटनास्थळी पाहणी केली असता एका पुरुषाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यु झाल्याचे दिसून आले. मयताची ओळख पटली नसून त्याचे वय अंदाजे २९ वर्ष, उंची५ फूट५ इंच, रंग सावळा, बांधा सडपातळ, लांबट चेहरा, केस काळे, तलवार कट मिशा, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, त्यावर काळ्या रंगाचा जॅकेट व काथ्या रंगाची अंडरवेअर असे वर्णन आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.