भिवंडीत सत्तापालट; कॉंग्रेस-शिवसेना युतीला झटका !

    दिनांक : 05-Dec-2019
भिवंडी: भिवंडी महानगर पालिकेत झालेल्या महापौर आणि उप ,महापौर निवडणुकीत भाजप व कोणार्क विकास आघाडीच्या साथीने महापौर पदी प्रतिभा पाटील विजयी झाल्या आहेत, तर उप महापौर पदी कॉंग्रेसचे इम्रान वली मोहम्मद खान हे विजयी झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस शिवसेना युती गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.

ल_1  H x W: 0 x 
 
भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे एकूण 47 नगरसेवक असून त्यापैकी 18 नगरसेवक कोणार्क विकास आघाडीकडे गेल्याने त्यांचा दारुण पराभव झाल्याने काँग्रेस व शिवसेनेला सत्तेपासून पायउतार व्हावे लागले आहे. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सुद्धा भाजप व कोणार्क विकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांना 49 मते मिळाली. त्यांनी शिवसेनेच्या बाळाराम चौधरी यांचा पराभव केला.
भिवंडी महापालिकेत एकूण 90 नगरसेवक असून त्यामध्ये कॉग्रेसचे 47, शिवसेना 12, भाजप 20, कोणार्क विकास आघाडी 4, समाजवादी पार्टी 2, आरपीआय (एकतावादी ) 4, अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसकडे बहुमत असूनही नगरसेवक फुटीची शक्यता लक्षात घेता 2017 मध्ये काँग्रेसने शिवसेनेच्या 12 नगरसेवकांना सोबत घेऊन सेनेला सत्तेत वाटा दिला होता. त्यामुळे भाजपने हि कोणार्क विकास आघाडीला मदतीशी घेऊन कॉंग्रेस शिवसेनेला मोठा झटका दिला आहे.