आरबीआय कडून पतधोरण जाहीर; रेपो रेट मध्ये कपात नाहीच

    दिनांक : 05-Dec-2019
मुंबई: रिझर्व्ह बॅंकऑफ इंडियाकडून आज  पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. आरबीआयकडून मागील 5 महिन्यांपासून सातत्याने रेपो रेट मध्ये कपात करण्यात आली होती. पण आजच्या डिसेंबर महिन्यातील जाहीर केलेल्या रेपो रेटमध्ये कोणतीही कपात न करण्यात आल्यामुळे हा रेपो रेट आता 5.15% वर कायम राहणार आहे.



ह_1  H x W: 0 x 
2019-20 मधील दुसर्‍या तिमाहीत खाली आलेला विकास दर व वाढलेला महागाई दर पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा बैठकीमध्ये दर कपात होण्याचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. जीडीपी देखील 6.1% वरून 5% वर उतरला आहे. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीसाठी महागाई दर 5.1% राहील, असाअंदाज बँकेने वर्तवला आहे. दरम्यान ओला दुष्काळ असल्याने सध्या भाजीपाल्यापासून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर चढे आहेत. ते पुढील काही दिवस कायम राहण्याचे चित्र आहे. रिव्हर्स रेपो रेट देखील 4.90% वर कायम असल्यामुळे कर्जदारांचे व्याजदर कायम राहणार आहेत.