हिंदुविरोधी पक्षासोबत युती केली म्हणून ४०० शिवसैनिकांनी सोडली शिवसेना !

    दिनांक : 05-Dec-2019
मुंबई: विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालेले असताना शिवसेनेने कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत युती करून सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यात अनेक शिवसैनिक नाराज झाले होते. आता त्या नाराजीचे परिणाम दिसू लागले आहे. मुंबईच्या धारावी येथे तब्बल ४०० शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
 

k_1  H x W: 0 x
k_1  H x W: 0 x 
 
विधानसभेत शिवसेनेने हिंदू विरोधी अशी प्रतिमा असलेल्या व आपल्या विचारसरणीच्या विरोधात असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पण शिवसैनिक मात्र या निर्णयामुळे दुखावले गेले होते. टी खदखद धारावी येथे प्रकट झाली. शिवसेनेच्या ४०० कामगारांनी शिवसेनेने हिंदू विरोधी पक्षासोबत युती केल्याने आपल्याला फसवणूक झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगत भाजप मध्ये प्रवेश केला आहे.