प्रकल्प रद्द करण्यावरून किरीट सोमय्यांचा सेनेवर हल्लाबोल

    दिनांक : 04-Dec-2019
मुंबई,
शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले आणि सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावे लागले आहे. त्यामुळे भाजपा नेते शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. आरे कारशेड प्रकल्पाला स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच अन्य प्रकल्पांबाबतही फेरविचार करणार असल्याचं सांगितले यावरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.

l_1  H x W: 0 x 
किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला, शिवसेनेने आपला रंग दाखवायला सुरुवात केली अशी तंगीक त्यांनी शिवसेनेवर केली. २ लाख कोटींच्या विकासकामांचे प्रकल्प स्थगित केले. रेल्वे, मुंबई, पुणे, नागपूर , समृद्धी महामार्ग, अनेक रस्ते प्रकल्प सर्वांना स्थगिती दिली का? कंत्राटदारांना सिग्नल द्यायचा आहे का? येऊन भेटावे असा आरोप त्यांनी शिवसेनेवर केला.
तसेच हे प्रकल्प रखडले तर प्रकल्पांची किंमत वाढणार आहे. त्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. भाजपा त्याचा निषेध करते अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली.किरीट सोमय्या आणि शिवसेनेमधील वाद खूप जुने आहेत. मातोश्रीसह उद्धव ठाकरे, राहुल शेवाळेंवर सोमय्या यांनी अनेकदा आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि कंत्राटदारांकडून मातोश्रीला टक्केवारी दिली जाते असा थेट आरोप सोमय्या यांनी यापूर्वीही लावले आहेत.