जे कायम नवीन असतं ते 'महापुराण'

    दिनांक : 04-Dec-2019
Total Views |
जळगाव: पुराण म्हणजे जुनं नव्हे. पुराण म्हणजे पुरा-अवि-नवं. हे कितीही जुनं असलं तरी सतत नवीनच रहायला हवं म्हणून पुराण आहे. देव कितीतरी प्राचीन असले तरी ते आपल्यासाठी कायम नवीन प्रसन्नित असतात. जे कधीही जुने न वाटता कायम नवीन असतं त्याला महापुराण म्हणतात, असे स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज यांनी सांगितले. शहरातील सागर पार्क मैदानावर आयोजित २१ दिवसीय श्रीमद भागवत कथा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी निरूपण करताना ते बोलत होते. श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
 

j_1  H x W: 0 x 
 
स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज यांनी निरूपण करताना पुढे सांगितले की, आपण एखादा चित्रपट, गाणं किंवा पुस्तक वारंवार पाहिले, ऐकले अथवा वाचले तर ते रटाळवाने, नकोसे वाटते परंतु पुराण नेहमी नवीनच वाटेल त्यात नवीन आनंद मिळेल. सदा सर्वदा नवनवीन रूप, बोली, विचार घेऊन श्रीमद भागवत महापुराण समोर येत असते. श्रीमद भागवत हे अपूर्ण नाव असून श्रीमद भागवत महापुराण असा त्याचा संपूर्ण उच्चार आहे. त्याच्या अर्धवट उच्चाराचे अर्थ देखील अर्धवट आणि चुकीचे होतात. श्रीमद म्हणजे श्रीकिशोरी राधाचं अनुमोदन असणे. भागवतमधील भा म्हणजे प्रकाश, ज्ञान, ग म्हणजे गती, व म्हणजे वरिष्ठ. सर्व शास्त्रांमध्येमध्ये वरिष्ठ असलेला ग्रंथ. त म्हणजे तारणारा. श्रीमद भागवत महापुराण तारणारे आहे. कथा करणारे लोक नाविक आहे असे स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज यांनी सांगितले.
 
 
स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज पुढे म्हणाले की, महापुराण महंतांचे दोतक आहे. महा शब्द पुढे लागल्याने कुणीही मोठं होत नाही. जसे राज्याचे नाव जरी महाराष्ट्र असले तरी राष्ट्र मोठे आहे. महापुराण १० लक्षणांचे लक्ष असते तर पुराण ५ लक्षणांचे लक्ष असते. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे भागवतमध्ये त्वरित भेटते परंतु ते घरापर्यंत घेऊन जाणे आपल्यावर आहे. प्राप्त होणे आणि ते जपून ठेवणे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे महाराजांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच भागवताच्या सानिध्यात आलेल्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असेही त्यांनी सांगितले.
 
 
कुंती आणि श्रीकृष्ण आरास ठरली आकर्षण
 
 
j_1  H x W: 0 x
 
श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानतर्फे आयोजित श्रीमद भागवत कथा महोत्सवात दुसऱ्या दिवशी कुंती आणि भगवान श्रीकृष्णाची सजीव आरास साकारण्यात आली होती. अत्यंत आकर्षक असलेल्या विलोभनीय रूपाने सर्वांचं लक्ष वेधून घेतले.